डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

नांदेड जिल्ह्याचे रहिवासी असलेले बीएसएफ जवान कामेश कदम यांना कर्तव्यावर असताना वीरमरण

नांदेड जिल्ह्याचे रहिवासी असलेले बीएसएफ जवान कामेश विठ्ठलराव कदम यांना काल हरयाणा इथं कर्तव्यावर असताना वीरमरण आलं. ते ४२ वर्षांचे होते. कर्तव्य बजावत असताना त्यांना हृदयविकाराचा धक्का आला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

कदम यांचा पार्थिव देह आज रात्री विशेष विमानाने नांदेड इथं आणला जाईल आणि उद्या सकाळी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील.