आयआरसीटीसीच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन टूर’ला प्रवाशांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. येत्या ९ जून रोजी मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून हेरिटेज टूर साठी निघणाऱ्या या गाडीचं आरक्षण पूर्ण झालं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी निगडित असलेल्या रायगड, शिवनेरी, प्रतापगड, पन्हाळा या किल्ल्यांचं तसंच लाल महाल, कसबा गणपती मंदिर, आणि शिवसृष्टी या स्थळांना प्रवासी भेट देतील.