ऊसतोडणी कामगार महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी राबवण्यात येईल ‘आरोग्य मित्र’ उपक्रम

ऊसतोडणी कामगार महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ‘आरोग्य मित्र’ उपक्रम राबवण्यात येईल, असं, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितलं आहे. त्या काल छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत बोलत होत्या. बालविवाह रोखण्याची मोहिम प्रभावीपणे राबवण्याची सूचना चाकणकर यांनी प्रशासनाला केली.