मिस वर्ल्ड २०२५ स्पर्धेत टॅलेंट स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी २४ प्रतिभावंत स्पर्धकांची निवड झाली. या स्पर्धेत सहभागी झालेल्या जगभरातल्या सुमारे १०० स्पर्धकांनी पारंपरिक कलाप्रकार सादर केले. यात शास्त्रीय संगीत, सुगम गीत गायन, नृत्याचा समावेश होता.
या फेरीत भारतासह अमेरिका, पोलंड, नायजेरिया, फिलिपिन्स अशा २४ देशांतील स्पर्धकांची निवड झाली असून टॅलेंट चॅलेंजच्या अंतीम फेरीत त्या सहभागी होणार आहेत. या फेरीत विजेत्या ठरणाऱ्या स्पर्धकाला सर्वोत्तम दहामध्ये प्रवेश मिळणार आहे.
दरम्यान, मिस वर्ल्ड स्पर्धेतील स्पर्धकांनी काल हैदराबादमधील शिल्पारमला भेट देत तेलंगणाच्या पारंपरिक कला आणि हस्तकला पाहिल्या आणि व्हिलेज म्युझियमची देखील सफर केली. स्पर्धकांनी महिला स्वयं-सहायता गटांशी तसंच हैदराबादमधील व्हिक्टोरिया मेमोरियल होमला भेट देत तिथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.