आज जागतिक थायरॉईड दिवस आहे. थायरॉईडबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. थायरॉईड ही मानेमध्ये असलेली एक लहान, फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी आहे. ही ग्रंथी चयापचय, हृदय गती, शरीराचे तापमान, ऊर्जा, मासिक पाळी यासारख्या महत्त्वाच्या कार्यांचं नियमन करणारी संप्रेरक तयार करते. सक्रिय आणि निरोगी जीवनशैली राखल्यानं थायरॉईडचा धोका कमी होऊ शकतो. थायरॉईड संप्रेरकांच्या उत्पादनासाठी आयोडीनयुक्त मीठ, दुग्धजन्य पदार्थ आणि आयोडीनयुक्त पदार्थ आहारात समाविष्ट करणं आवश्यक आहे.
Site Admin | May 25, 2025 1:40 PM | World Thyroid Day
आज जागतिक थायरॉईड दिवस
