डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

वॉशिंग्टनमध्ये जागतिक बँक जमीन परिषदेचं आयोजन

वॉशिंग्टन इथल्या जागतिक बँकेच्या मुख्यालयात ५ ते ८ मे दरम्यान होणाऱ्या ‘जागतिक बँक जमीन परिषद २०२५’ या परिषदेत ‘जागतिक जमीन सुधारणा’ संवादा’चं नेतृत्व करणार आहे. पंचायती राज मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज यांच्या नेतृत्वाखालचं उच्चस्तरीय भारतीय शिष्टमंडळ या परिषदेत स्वामित्व योजना तसंच ग्राम मंचित्र मंचाविषयीची माहिती सादर करणार आहे. ‘हवामान कृतीसाठी जमिनीची मालकी आणि प्रवेश सुरक्षित करणे: जागरूकतेकडून कृतीकडे वाटचाल’ अशी या वर्षीच्या जागतिक बँकेच्या जमीन परिषदेची मुख्य संकल्पना  आहे. 

 

जमिनीची मालकी सुरक्षित करण्यासाठी जागतिक नेते, धोरणकर्ते, तज्ञ आणि विकास भागीदारांना एकत्र आणायचं काम ही परिषद करणार आहे. जागतिक बँक जमीन परिषद २०२५ मध्ये भारताचा सहभाग हा जागतिक ग्रामीण जमीन प्रशासनात एक महत्त्वाचा टप्पा आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.