सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर वन्यजीवांची तस्करी करत असलेल्या एका व्यक्तीला अटक केली. अधिकाऱ्यांनी त्याच्याकडून विविध प्रजातींचे 52 जिवंत आणि १ मृत वन्यजीव जप्त केले आहेत. यात शिंगासारख्या शेपटाचे ३ विषारी जातीचे जिवंत साप अर्थात स्पायडर टेल्ड हॉर्नड वायपर ५ जिवंत पानसदृश्य आशियायी कासव, आणि ४४ जिवंत इंडिनेशियायी विषारी सापांचा समावेश आहे.
यासंदर्भातली खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी विमानतळावर सापळा रचून संबंधित व्यक्तिची झटती घेतली. त्यावेळी त्याच्याकडून तस्करीसाठी नेले जात असलेले वन्यजीव जप्त केले गेले. सीमाशुल्क विभागाने या व्यक्तीला अटक करून, त्याच्याविरोधात तपास सुरू केला आहे.