महिलांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षित वाटावं आणि अत्याचाराविरुद्ध दाद मागता यावी यासाठी राज्य सरकार सर्व खाजगी आस्थापनांमध्ये विशाखा तक्रार समिती स्थापन करणे बंधनकारक करणार असल्याचं महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं . सर्व शासकीय कार्यालयात या विशाखा समित्या स्थापन झाल्या असून खाजगी आस्थापनांमध्ये त्या स्थापन व्हाव्यात यासाठी महिला आणि बालविकास आयुक्तालयाला राज्य समन्वय अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. महिलांना SHE BOX ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून देखील तक्रार नोंदविता येईल असे तटकरे यांनी सांगितलं .
Site Admin | March 17, 2025 8:34 PM
खासगी आस्थापनांमधे विशाखा समिती स्थापन करणं बंधनकारक करणार
