देशातली जनगणना १ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयानं सांगितलं आहे. ही जनगणना दोन टप्प्यात होईल. १ ऑक्टोबर २०२६ पासून जम्मू काश्मीर, लडाख, उत्तराखंड, आणि हिमाचल प्रदेशमधे जातनिहाय जनगणनेला सुरुवात होईल.
तर १ मार्च २०२७ पासून उर्वरित देशात जनगणना सुरू होईल. मागील जनगणना २०११ ला झाली होती. त्यानंतर २०२१ ला जनगणना होणं अपेक्षित होतं. मात्र तब्बल पाच वर्ष उशीराने जनगणना होत आहे.