April 7, 2025 3:01 PM April 7, 2025 3:01 PM

views 21

आज ‘जागतिक आरोग्य दिवस’

आरोग्यविषयक जागरूकता वाढविण्यासाठी आज जगभरात सर्वत्र आरोग्य दिवस साजरा केला जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना १९४८ मध्ये या दिवशी झाली. या वर्षीच्या आरोग्य दिवसाची मध्यवर्ती संकल्पना निरोगी सुरुवात, आशादायक भविष्य अशी आहे. माता आणि नवजात बालकांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करणं हा या संकल्पनेमागचा हेतू आहे. येत्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाला ७५ दिवस उरलेले असताना आयुष मंत्रालयांतर्गत मोरारजी देसाई योग संस्थेनं आजपासून ७५ दिवसांच्या योग महोत्सवाचं ओडिशामध्ये भुवनेश्वर इथं आयोजन केलं आहे.   &nb...