April 23, 2025 7:02 PM

views 19

राज्यातल्या शेतकऱ्यांनी पिकवलेली तूर आधारभूत दरानं खरेदी करायला केंद्रसरकारची मंजुरी

खरेदी वर्ष २०२४-२५ साठी राज्यात शेतकऱ्यांनी पिकवलेली सगळी तूर किमान आधारभूत दरानं खरेदी करायला केंद्रसरकारनं मान्यता दिली आहे. महाराष्ट्राबरोबरच आंध्र प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, हरयाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, तेलंगण आणि उत्तर प्रदेश या राज्यांमधली एकूण १३ लाख २२ हजार टन तूर याअंतर्गत खरेदी केली जाणार आहे.    आयातीवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी देशांतर्गत डाळींचं उत्पादन वाढवण्यात योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय...