October 2, 2024 7:57 PM

views 64

स्वच्छ भारत अभियानाच्या दशकपूर्ती निमित्त विविध कार्यक्रम

गांधी जयंतीनिमित्त आज सर्वत्र स्वच्छता दिवस साजरा करण्यात आला. स्वच्छ भारत अभियानाला दहा वर्ष पूर्ण झाल्या निमित्त नवी दिल्ली इथं आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांसमवेत भाग घेतला. यावेळी स्वच्छतेशी संबंधित नऊ हजार सहाशे कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांचा प्रारंभ त्यांच्या हस्ते झाला. यात अमृत प्रकल्प स्वच्छ गंगा राष्ट्रीय अभियान आणि गोबरधन योजनेअंतर्गत १५ बायोगॅस प्रकल्पांचा समावेश आहे.    अमृत-२ योजनेंतर्गत सातारा पालिकेच्‍या स्वयंचलित पाणीपुरवठा प्रकल्‍पाचं तस...

September 20, 2024 7:47 PM

views 55

अहमदनगर जिल्ह्यात स्वच्छता अभियानाचे आयाेजन

देशभरात सुरू असलेल्या स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत अहमदनगर जिल्ह्यात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. माळीवाडा इथल्या विशाल गणेश मंदिर परिसर ते आंबेडकर चौक परिसरात स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला. नांदेड जिल्ह्यात स्वच्छता पंधरवड्यानिमित्त महापालिकेच्या वतीने आज नांदेड रेल्वे स्थानक आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवली गेली. या मोहिमेत विद्यार्थी, शिक्षक आणि स्वच्छता प्रेमी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर भाग घेतला.

September 17, 2024 4:29 PM

views 61

‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाला आजपासून देशभरात सुरुवात

देशभरात आजपासून ‘स्वच्छता ही सेवा अभियान २०२४’ ला सुरुवात झाली. येत्या २ ऑक्टोबरपर्यंत हे अभियान सुरू असेल. स्वभाव स्वच्छता-संस्कार स्वच्छता ही यंदाच्या अभियानाची संकल्पना आहे. यंदाच्या अभियानासाठी संपूर्ण समाजाचा सहभाग असावा या दृष्टीने श्रमदान मोहिमा, जन भागिदारी आणि सफाई मित्र हे तीन प्रमुख स्तंभ म्हणून निश्चित केले गेले आहेत. या अभियाना अंतर्गत पर्यटनस्थळं, सार्वजनिक इमारती, व्यापारी क्षेत्र, पाणवठे, प्राणिसंग्रहालयं, अभयारण्ये, सामुदायिक आणि सार्वजनिक स्वच्छतागृह अशा विविध ठिकाणी स्वच्छतावि...

September 12, 2024 9:03 AM

views 82

जल जीवन मिशन तसंच स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीला गती द्यावी – मंत्री गुलाबराव पाटील

जल जीवन मिशन तसंच स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीला गती द्यावी, असे निर्देश पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. काल मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालयांची उभारणी, वैयक्तिक घरकुलं तसंच शौचालयांची कामं जलद पूर्ण करावीत, १५ व्या वित्त आयोगातून मिळणाऱ्या निधीतून या घटकांवर खर्च करण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना देण्यात याव्यात, असंही गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.