December 28, 2024 7:59 PM

views 19

टॅक्सी भाड्यात बदल होत असल्याच्या आरोपांची चौकशी करण्याचे ग्राहक व्यवहार मंत्र्यांचे आदेश

टॅक्सी भाड्यात जागा आणि  वेळेनुसार बदल होत असल्याच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिले आहेत. एकाच प्रवासाकरता अॅपल आणि अँड्रॉईड उपकरणांवरुन  बुक केलेल्या टॅक्सीचं भाडं वेगवेगळं आकारलं जात असल्याची तक्रार आल्यावरुन केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण ही चौकशी करणार आहे. अशाच प्रकारे अन्नपदार्थ पोहोचवणाऱ्या सेवा, ऑनलाईन तिकिटं आरक्षण सेवा आणि इतर सेवांसाठीही भाडे आकारणीत फरक केला जात आहे का याचीही चौकशी करण्यात येणार असल्याचं जोशी यांनी समाजामाध्यम...

December 24, 2024 3:39 PM

views 19

ई-कॉमर्समधले गैरव्यवहार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचं उद्घाटन

राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने ऑनलाईन व्यासपीठांवरचा धोका ओळखण्यासाठी आणि ग्राहकांना सक्षम करण्यासाठी केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज तीन नव्या ऍपचं उद्घाटन केलं. यात जागो ग्राहक जागो ऍप, जागृती ऍप, आणि जागृती डॅशबोर्डचा समावेश आहे. या ऍपमुळे फसवणुकीच्या प्रकरणाविरोधात कारवाई करणं केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधीकरणाला शक्य होणार आहे. जागो ग्राहक ऍपमुळे ग्राहकांना URL ची माहिती मिळणं शक्य होणार आहे. तसंच यातून काही धोका असल्यास ग्राहकाला सावधानतेचा इशारा दिला जाणार आहे....

December 18, 2024 5:31 PM

views 12

२०२३-२४ हंगामातली १ लाख ११ हजार कोटी रुपयांची ऊस थकबाकी जमा

२०२२-२३ च्या गळीत हंगामापर्यंतची ९९ पूर्णांक ९ दशांश टक्के ऊस थकबाकी चुकती केल्याची माहिती ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात दिली. २०२३- २४ या हंगामातली एक लाख अकरा हजार कोटी रुपयांची थकबाकी देण्यात आली आहे तर चालू हंगामात ११ हजार १४१ हजार कोटींपैकी ८ हजार १२६ कोटी रूपये दिल्याचं त्यांनी सांगितलं.

June 26, 2024 5:40 PM

views 30

सभापतीपदासाठी उमेदवार दिल्याबद्दल भाजपाची काँग्रेसवर टीका

लोकसभेच्या सभापतीपदासाठी काँग्रेसनं उमेदवार उभा केल्याबद्दल केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज टीका केली. ते संसदेबाहेर वार्ताहरांशी बोलत होते. उपसभापतीपदासाठी सरकार चर्चेला तयार आहे मात्र त्यासाठी पूर्व अटी घालणं योग्य नाही असंही ते म्हणाले. ]लोकसभा सभापतीपदासाठी विरोधी पक्षांनी दबावाचं राजकारण केल्याची टीका केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंग यांनी केली. सरकारनं या मुद्द्यावर कोणतीही चर्चा केली नाही, असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं.

June 25, 2024 3:17 PM

views 25

स्वच्छ इंधन निर्मितीच्या क्षमतेमुळे ऊसाचा भाव नव्या उंचीवर पोहोचला – मंत्री प्रल्हाद जोशी

स्वच्छ इंधन निर्मितीच्या क्षमतेमुळे ऊसाचा भाव नव्या उंचीवर पोहोचला आहे, असं केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत भारताच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या ६४ व्या आंतरराष्ट्रीय साखर संघटनेच्या बैठकीत बोलत होते.  ऊसापासून साखर तर त्याच्या कचऱ्यापासून इथेनॉल मिळत असल्यामुळे कमीत कमी पाण्याचा वापर करून ऊसाचं उत्पादन वाढवण्याबाबत संशोधन करण्याचं आवाहन जोशी यांनी उपस्थित तज्ञांना केलं.