November 12, 2024 7:09 PM

views 29

काँग्रेस विविध जातींना आपापसात लढवण्याचा प्रयत्न करत असल्याचा प्रधानमंत्र्यांचा आरोप

महायुतीचं सरकार हवं, असा जनतेचा आवाज राज्याच्या कानाकोपऱ्यातून ऐकू येत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोलापूर इथं जाहीर सभेत म्हणाले. काँग्रेस आरक्षण संपवण्याचा प्रयत्न करत असून विविध समाजात फूट पाडण्याचा, विविध जातींना आपापसात लढवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी केला.    महाराष्ट्राला स्थिर आणि विकासाची दृष्टी असणाऱ्या सरकारची गरज असून महायुती सत्तेत आल्यावर दूरगामी योजना आखेल असं मोदी म्हणाले.   महायुती सत्तेत आल्यावर राज्याच्या विकासाचा व...

November 10, 2024 8:05 PM

views 11

भाजपने कायमच आदिवासींचं हित आणि कल्याणाची काळजी घेतली – प्रधानमंत्री

झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातल्या विधानसभा निवडणुकांसाठीच्या प्रचाराकरता उद्याचा एकच दिवस उरला असल्यानं सर्वपक्षीय ज्येष्ठ नेते मतदारांपर्यंत पोहोचून आपापल्या उमेदवारांना मतदारांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.   भाजपाचे ज्येष्ठ नेते, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज रांची इथं रोड शो केला. तसंच, गुमला आणि बोकारो इथं जाहीर सभांना संबोधित केलं. भाजपानं कायमच आदिवासींचं हित आणि कल्याणाची काळजी घेतली, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बोकारो इथं भाजपाच्या प्रचारसभेला संबोधित करताना म्हणाले....

November 9, 2024 8:11 PM

views 25

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडच्या २५व्या स्थापनादिनानिमित्त दिल्या शुभेच्छा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडच्या २५व्या स्थापनादिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. उत्तराखंड राज्यानं विविध क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करुन विकासाची नवी उंची गाठली आहे, असं त्यांनी यानिमित्त आयोजित कार्यक्रमात दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून बोलताना सांगितलं. केंद्र सरकार उत्तराखंडच्या प्रगतीसाठी वचनबद्ध असून आगामी २५ वर्षात राज्यानं विकसित भारतासाठी विकसित उत्तराखंड हे ध्येय समोर ठेवून कार्य करावं, असं ते म्हणाले.

November 8, 2024 7:40 PM

views 22

किसान सन्मान निधीची रक्कम १५ हजार करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आश्वासन

महायुती सत्तेवर आल्यास किसान सन्मान निधीची रक्कम १२ हजारावरुन १५ हजार करण्याचं आश्वासन मोदी यांनी नाशिक शहरात पंचवटी इथल्या प्रचारसभेत दिलं. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडें यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी आदरांजली वाहिली. जनहितासाठी उज्ज्वला योजना, जलजीवन मिशन, नळाद्वारे घराघरात पिण्याचं पाणी, मोफत अन्नधान्य, पीएम आवास योजनेत घर, कापूस-धान-सोयाबीन पिकांना अधिक हमी दर, दुधाच्या दरात वाढ तसंच शेतकऱ्यांसाठी कांदा निर्यातीवरचे निर्बंध हटवण्याचा निर्णय  सरकारने  घेतल्याचा उल्लेख त्यांनी...

November 8, 2024 9:54 AM

views 13

 निवडणुकीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आज दोन प्रचार सभा

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी ज्येष्ठ भाजपा नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दौरा आजपासून सुरू होणार आहे. येत्या 14 नोव्हेंबर पर्यंत धुळे, नाशिक, अकोला, नांदेड, चंद्रपूर, चिमूर, सोलापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई आणि मुंबई इथं पंतप्रधानांच्या प्रचार सभा होणार आहेत. आपल्या महाराष्ट्र दौऱ्यात ते आज धुळे आणि नाशिक जिल्ह्यात प्रचार सभांना संबोधित करतील.   महाराष्ट्रातले मतदार महायुतीलाच निवडून देतील असा विश्वास त्यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात व्यक्त केला आ...

November 7, 2024 1:21 PM

views 22

निवडणुकीत विजयाबद्दल प्रधानमंत्र्यांनी केलं डोनाल्ड ट्रंप यांचं अभिनंदन

  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं अभिनंदन केलं आहे. देशाच्या एकसंध प्रगतीसाठी सत्तेचं शांततापूर्वक हस्तांतरण केलं जाईल असं ते म्हणाले. ज्यो बायडन आज देशाला उद्देशून आपला संदेश देणार असल्याचंही व्हाईट हाऊसनं म्हटलं आहे. उपराष्ट्राध्यक्ष व या निवडणुकीतील पराभूत उमेदवार कमला हॅरिस यांनीही दूरध्वनी वरुन  डोनाल्ड ट्रम्प याचं अभिनंदन केलं आहे.   

November 4, 2024 8:12 PM

views 26

हेमंत सोरेन सरकारनं झारखंड मधल्या लोकांची फसवणूक केली – प्रधानमंत्री

हेमंत सोरेन सरकारनं झारखंड मधल्या लोकांची फसवणूक केली असल्याची टीका प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज झारखंड मधल्या गढवा इथं केली. ते झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जनसभेला संबोधित करताना बोलत होते.

November 4, 2024 3:10 PM

views 15

आसामच्या लोकांना भाषा गौरव सप्ताहाच्या प्रधानमंत्र्यांकडून शुभेच्छा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आसामच्या लोकांना भाषा गौरव सप्ताहाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आसाममध्ये भाषा गौरव सप्ताह येत्या ३ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर दरम्यान साजरा करण्यात येत आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची समाजमाध्यमावरील पोस्ट शेअर करताना प्रधानमंत्री मोदी म्हणाले की आसामी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी आसामच्या लोकांचा उत्साह अधोरेखित करण्यासाठी हा सप्ताह एक उल्लेखनीय प्रयत्न आहे. सप्ताह साजरा करण्याच्या उपक्रमांनी राज्यातले लोक आणि आसामी संस्कृती यांच्यातले संबंध...

November 4, 2024 1:13 PM

views 21

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी प्रधानमंत्र्यांच्या आज दोन प्रचारसभा

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवारांसाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दोन प्रचारसभा घेत आहेत. झारखंड मुक्ती मोर्चाचं सरकार विकासात खोडा घालत असल्याचा आरोप गढवा इथल्या सभेत मोदी यांनी केला.   विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर झारखंडमध्ये मोदींची ही पहिलीच निवडणूक प्रचार सभा आहे. चाईबासा इथं दुसरी सभा होणार असल्याची माहिती, झारखंड भाजपचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांनी दिली आहे. झारखंडमधे 13 आणि 20 न...

November 3, 2024 7:59 PM

views 14

देशातलं क्षयरोगाचं कमी झालेलं प्रमाण, हे समर्पण भावनेनं केलेल्या नाविन्यपूर्ण प्रयत्नांचं फलित आहे – प्रधानमंत्री

देशातलं क्षयरोगाचं कमी झालेलं प्रमाण, हे समर्पण भावनेनं केलेल्या नाविन्यपूर्ण प्रयत्नांचं फलित असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारतात २०१५ ते २०२३ या कालावधीत क्षयरोगाचं प्रमाण १७ पूर्णांक ७ दशांश टक्क्यांनं घसरल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटलं आहे. आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी काल याबाबत समाज माध्यमांवरून माहिती दिली होती. त्याचाच दाखला देत प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरून भारताच्या या प्रगतीचं कौतुक केलं. या पुढेही सरकार देशाला क्षयरोगमुक्त करण्यासाठी सा...