June 17, 2024 7:32 PM

views 46

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार विलास पोतनीस यांच्यावर गुन्हा दाखल

लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी शस्त्रधारी पोलीस संरक्षकासह प्रवेश केल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार विलास पोतनीस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले शिवसेनेचे उमेदवार रविंद्र वायकर यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यांच्या तक्रार अर्जाची दखल घेऊन गोरेगावच्या वनराई पोलिसांनी काल रात्री उशिरा पोतनीस यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.