January 14, 2025 2:55 PM

views 11

राज्यात मकरसंक्रांती सणाचा उत्साह

मकरसंक्रांतीचा सण आज राज्यात उत्साहाने साजरा होत आहे. तीळगूळ घ्या गोड बोला असं आवाहन करत संक्रांती निमित्त शुभेच्छांची देवाण घेवाण होत आहे. घरोघरी ताजे हरभरे, उसाचे करवे बोरं आणि सौभाग्यचिन्हांनी सजलेल्या मातीच्या सुगडांचं पूजन आज केलं जातं. याशिवाय दानधर्मही केला जातो. राज्यात ठिकठिकाणच्या मंदिरांमधे संक्रांतीनिमित्त देवदर्शनासाठी गर्दी झाली आहे. मंदिरांना सजावट करण्यात आली आहे. नाशिकमध्ये गोदावरी नदीत रामकुंडावर स्नानासाठी गर्दी झाली आहे.   ठिकठिकाणी पतंग उडवण्याचा खेळ रंगला आहे. घातक मां...