April 2, 2025 7:42 PM

views 26

वक्फ सुधारणा विधेयकाचं सत्ताधाऱ्यांकडून स्वागत, विरोधकांची टीका

भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेतील धर्मनिरपेक्षता वक्फ सुधारणा विधेयकातून प्रतिबिंबित होत असल्याचं प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. वक्फ सुधारणा विधेयक हे कोणत्याही धर्माच्या विरोधात किंवा कोणाच्याही आस्थेला ठेस पोहचविणारे नाही. त्यामुळे ज्यांची सद्सद्विवेकबुद्धी जिवंत आहे अशी प्रत्येक व्यक्ती या सुधारणा विधेयकाला पाठिंबा दर्शवेल असं ते म्हणाले.   जुन्या कायद्यात वक्फ बोर्डाला अमर्याद अधिकार होते. चुकीच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याची मुभा नव्हती. हे सुधारणा ...

April 2, 2025 7:58 PM

views 27

राज्यात अवकाळी पावसाचा इशारा

राज्याच्या जवळपास सर्वच भागात आज आणि उद्या अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचीही शक्यता आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर, बीड, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. भंडारा, गोंदिया, छत्रपती संभाजीनगर, जालना, धुळे आणि नंदूरबार वगळता राज्यातल्या इतर सर्व जिल्ह्यात आज हवामान विभागानं यलो अलर्ट दिला आहे.

April 1, 2025 8:47 PM

views 24

महाराष्ट्र राज्य मंत्रीमंडळ निर्णय…

बाईक टॅक्सी वाहनांच्या समुच्चयक धोरणाला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. त्यानुसार १ लाख लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमधे रमानाथ झा समितीच्या शिफारशी सुधारणेसह लागू करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला.    नोंदणीकृत वाहन निष्कासन केंद्रामध्ये स्वेच्छेनं निष्कासित केलेल्या वाहनांच्या अनुषंगानं सुधारित कर सवलत लागू करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला.   वडसा-देसाईगंज-गडचिरोली या रेल्वे मार्गासाठी १ हजार ८८६ कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला मंत्रिमंडळानं मान्यता दिली. यापैकी...

April 1, 2025 7:46 PM

views 65

अवकाळी पावसामुळे पीकांचं नुकसान

सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट सुरू असून उर्वरित भागात सोसाट्याचा वारा सुरू आहे.   जालना जिल्ह्यात आज काही ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली. घनसावंगी तालुक्यातल्या अनेक गावांमधे जोरदार पाऊस झाला. यामुळे मका, गहू आणि हरभऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे.    पालघर जिल्ह्यात कालपासून ढगाळ वातावरण होतं. जिल्ह्यातल्या काही भागात हलका पाऊस पडला.

April 1, 2025 8:49 PM

views 32

महाराष्ट्र राज्य शासन आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यात सामंजस्य करार

कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासाठी, शासकीय कारभारात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या प्रभावी उपयोगासाठी राज्य शासन आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यात आज सामंजस्य करार झाला. या भागीदारीअंतर्गत मुंबईत भूगोल विश्लेषण केंद्र, पुण्यात न्यायपूरक विज्ञान संशोधन आणि ए.आय. केंद्र, तर नागपूर - मार्व्हेल केंद्र, अशी तीन ए.आय. उत्कृष्टता केंद्रं राज्यात स्थापन केली जातील.  शासनाच्या सेवा अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि नागरिकहितैषी बनवण्यासाठी मायक्रोसॉफ्ट Copilot तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं शासना...

April 1, 2025 7:14 PM

views 16

सर्वंकष नाट्यगृह धोरण लवकरच तयार करण्यात येणार असल्याची सांस्कृतिक कार्यमंत्र्यांची घोषणा

महाराष्ट्र हे कलासंपन्न राज्य आहे. त्यामुळे इथली नाट्यगृहं कशी असावीत तसंच कलाकार आणि प्रेक्षकांना काय सुविधा असाव्यात याविषयी सर्वंकष नाट्यगृह धोरण येत्या दोन महिन्यात तयार करण्यात येईल अशी घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी आज केली. वर्धा इथे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी शेलार यांच्या हस्ते साडेआठ कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचं भूमिपूजनही करण्यात आलं.

March 31, 2025 2:41 PM

views 13

अर्थसंकल्पातल्या तरतुदीपेक्षा जास्त झालेल्या वाढीचा स्पष्ट उल्लेख करण्याचे मुख्य सचिवांचे निर्देश

महाराष्ट्रात राज्य शासनाच्या सर्व विभागांनी राज्य मंत्रिमंडळासमोर नवा प्रस्ताव ठेवताना खर्चात अर्थसंकल्पातल्या तरतुदीपेक्षा जास्त झालेल्या वाढीचा स्पष्ट उल्लेख करण्याचे निर्देश राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिले आहेत. नवीन प्रस्तावात खर्चात झालेली वाढ यामुळे स्पष्टपणे लक्षात येईल, तसंच त्या वाढीसाठी संबंधित विभागाला जबाबदार धरता येणार आहे. वाढलेला खर्च मूळ तरतुदीपेक्षा किती जास्त आहे हे नमूद केल्याशिवाय प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवू नये असे निर्देश सौनिक यांनी दिले आहेत. राजकोषीय तूटी...

March 28, 2025 9:12 PM

views 26

शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा नुकसान भरपाई

राज्यातल्या ६४ लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच पीकविमा नुकसानभरपाई जमा होणार असल्याचं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं आहे. शासनानं विमा कंपन्यांना द्यायचा २ हजार ८५२ कोटी रुपयांचा प्रलंबित हप्ता वितरित करायला मान्यता दिल्यामुळे आता लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या आधारशी जोडलेल्या खात्यात पीकविमा नुकसान भरपाईची रक्कम थेट जमा होईल असं ते म्हणाले. 

March 28, 2025 7:40 PM

views 29

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची जिल्हानिहाय निरीक्षक म्हणून नियुक्ती

काँग्रेस पक्षात संघटनात्मक फेरबदलाचा भाग म्हणून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची जिल्हानिहाय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अहवालानंतर संघटनेत बदल होतील. या निरीक्षकांची बैठक आज सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. हे सर्व निरीक्षक त्यांना नेमून दिलेल्या जिल्ह्यांमध्ये जाऊन पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून १५ दिवसांत प्रदेश काँग्रेसला अहवाल सादर करणार आहेत. त्यानंतर संघटनात्मक फेरबदलांच्या प्रक्रियेला सुरुवात होईल.

March 28, 2025 8:45 PM

views 32

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता लवकरच मिळणार

'नमो शेतकरी महासन्मान निधी योजने'च्या सहाव्या हप्त्यांतर्गत उद्यापासून ९३ लाख २६ हजार शेतकरी कुटुंबांना लाभ वितरित केला जाणार आहे. सहाव्या हप्त्यात सुमारे २ हजार १६९ कोटी रुपये रक्कम पात्र लाभार्थ्यांच्या आधार आणि डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात जमा केली जाईल असं शासनाने कळवलं आहे.