December 30, 2025 8:31 PM

views 25

इस्राइलचे गाझा पट्टीतल्या अनेक भागात तोफगोळे आणि हवाई हल्ले

इस्राइलनं आज गाझा पट्टीतल्या अनेक भागात तोफगोळे आणि हवाई हल्ले केले. १० ऑक्टोबरला झालेल्या शस्त्रसंधीचं हे उल्लंघन असल्याचं गाझातल्या प्रशासनानं म्हटलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कालच इस्राइलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यानू यांची भेट घेऊन शस्त्रसंधीच्या पुढच्या टप्प्याची चर्चा केली होती. यावेळी नेत्यानू यांनी इस्राइलचा पहिला शांतता पुरस्कार ट्रम्प यांना जाहीर झाल्याची घोषणा केली होती.

September 29, 2025 1:36 PM

views 30

लेबननमधल्या हिजबोला संघटनेच्या तळांवर इस्रायलचा हवाई हल्ला

इस्रायलने लेबननमधल्या हिजबोला संघटनेच्या तळांवर हवाई हल्ला केला.  कफर रेमेन आणि अल जर्मक या भागात मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्रं डागण्यात आली. इस्रायलने हिजबोलाच्या शस्रास्त्र तळांवर हल्ला केल्याचा दावा इस्रायली सैन्याने केला आहे. गेल्या वर्षी दोन्ही देशांमधे युद्धबंदी करार झाला होता, तरीही ही  चकमक झडली आहे. गेल्यावर्षी दोन्ही देशात झालेल्या  संघर्षात १७ हजार जण जखमी झाले होते.

October 3, 2024 8:39 PM

views 45

इस्राईलनं केलेल्या हवाई हल्ल्यामुळे लेबनानमधले सुमारे १२ लाख लोक विस्थापित

इस्राईलनं केलेल्या हवाई हल्ल्यामुळे लेबनानमधले सुमारे १२ लाख लोक विस्थापित झाले आहेत. इस्राईलनं बैरुत आणि उपनगरांवर सुरु असलेल्या  हवाई हल्ल्याची तीव्रता वाढवल्यानं तसंच जमिनीवरूनही सैनिकी कारवाई सुरु केल्यानं लेबनानच्या दक्षिण आणि पूर्व भागातल्या लोकांनां आपली घरं सोडावी लागली आहेत. यापैकी काही विस्थापितांनी सुरक्षित भागात सार्वजनिक ठिकाणी तात्पुरता आश्रय घेतला आहे तर अनेक विस्थापित देशाची सीमा ओलांडून सीरियामध्ये दाखल झाले आहेत.