December 24, 2024 12:50 PM

views 21

IMD अंदाजांच्या अचूकतेत गेल्या दहा वर्षांत ४० ते ५० टक्क्याची वाढ

भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेल्या अंदाजांच्या अचूकतेत गेल्या दहा वर्षांत ४० ते ५० टक्क्याची वाढ झाल्याची माहिती विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी दिली आहे. अतिवृष्टीच्या अंदाजाची अचूकता देखील ६० टक्क्याहून ८० टक्क्यापर्यंत वाढली आहे. या विभागाकडे सध्या साडेपाचशे विभागीय वेधशाळा, दोन हजार स्वयंचलित हवामान केंद्र आणि ३९ ठिकाणी डॉप्लर रडार प्रणाली कार्यरत आहेत, असंही ते यावेळी म्हणाले. पुढच्या दोन वर्षांत आणखी ३४ रडार बसवले जातील ज्यामुळे पुढच्या पाच वर्षांत याच अंदाजांच्या अचूकत...

December 2, 2024 7:29 PM

views 20

येत्या दोन दिवसात, राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

गेल्या चोवीस तासात, राज्यातल्या सर्व विभागांमधे तुरळक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली. सर्वात कमी किमान तापमान ब्रम्हपुरी इथं १४ पूर्णांक ५ दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं.    येत्या दोन दिवसात, राज्यातल्या चारही विभागांमधे तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली  आहे. या काळात कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. 

October 14, 2024 8:17 PM

views 24

केरळमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये ‘रेड अलर्ट’ जारी

केरळमधल्या कन्नुर जिल्ह्यात ऑरेंज तर इडुकी, मलप्पुरम, कोझीकोड आणि वायनाड जिल्ह्यात हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. इतर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. येत्या काही दिवसांत पावासाचा जोर आणखी वाढेल, असंही हवामान विभागाने कळवलं आहे.

October 1, 2024 3:36 PM

views 24

राज्यात यंदाच्या हंगामात सरासरीच्या तुलनेत १२६ टक्के पाऊस

यंदाच्या हंगामात राज्यात १२६ टक्के पाऊस पडला. सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडेल हा हवामान विभागाचा अंदाज खरा ठरल्याची माहिती हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे. हिंगोली आणि अमरावती वगळता राज्यातल्या सर्व जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. अहमदनगरमध्ये ४९ टक्के तर सांगलीत ४८ टक्के अधिक पावसाची नोंद झाली. जळगाव, नाशिक, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत ४० टक्के पेक्षा जास्त पाऊस झाला. हिंगोलीमध्ये सरासरीपेक्षा ३५ टक्के कमी तर अमरावतीमध्ये २ टक्के कमी ...

September 26, 2024 3:47 PM

views 19

पालघर आणि नाशिकमध्ये उद्या सकाळीपर्यंत ‘रेड अलर्ट’

हवामान विभागानं उद्या सकाळी साडे ८ वाजेपर्यंत पालघर आणि नाशिकमध्ये रेड अलर्ट दिला आहे. या दोन्ही जिल्ह्यात वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि ठाणे, रायगड तसंच पुण्यात ऑरेंज अलर्ट आहे. राज्याच्या इतर भागातही आज जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

September 25, 2024 8:28 PM

views 32

उद्या राज्यातील काही जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’

ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी  आणि पुणे या जिल्ह्यांसाठी उद्या सकाळपर्यंत हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी अति जोरदार पावसाची दाट शक्यता असून उदया नाशिकमधे रेड अलर्ट दिला आहे. येत्या दोन दिवसांत पुणे, नाशिक, सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. नैऋत्य मोसमी पावसाची परतीची रेषा कायम असून कालपासून कोकणात काही ठिकाणी, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. 

September 24, 2024 10:37 AM

views 18

कोकण, कर्नाटक आणि गोवा किनारपट्टी लगतच्या भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा

कोकण, कर्नाटक आणि गोवा या सागरी किनारपट्टी लगतच्या राज्यांना आज मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर उत्तर कर्नाटक,मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्येही आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.   केरळ, आंध्रप्रदेश किनारपट्टी, रायलसीमा, तेलंगण, गुजरात, ओडिशा, अरुणाचल प्रदेश, नागालँड, माणिपूर, मिजोरम, त्रिपुरा, मध्यप्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगढ मध्येही आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

September 19, 2024 1:17 PM

views 22

उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मध्य प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज

पुढच्या तीन दिवसांत उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मध्य प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. तर छत्तीसगड, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुराच्या विविध भागांमध्ये येत्या २४ सप्टेंबर पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. येत्या आठवड्यात कोकण आणि गोव्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.

September 18, 2024 1:35 PM

views 22

देशातल्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज

मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. हरियाणा, चंदिगड, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि अंदमान-निकोबार बेटांच्या काही भागांमध्येही मुसळधार पाऊस होईल. आज संध्याकाळपर्यंत मध्य प्रदेशचा उत्तर भाग आणि उत्तर प्रदेशाच्या काही भागात ताशी साठ किलोमीटर वेगानं वादळी वारे वाहण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. 

August 26, 2024 7:55 PM

views 24

येत्या दोन दिवसात, कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस पडण्याची शक्यता

येत्या दोन दिवसात, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी विदर्भात अनेक ठिकाणी, तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात, कोकणात किनारपट्टीवर वारे वाहण्याची तसंच तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.