May 21, 2025 9:34 AM

views 24

FSSAI चं विशेष अंमलबजावणी मोहिम राबवण्याचं आवाहन

भारतातील अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना, फळं पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या द्रव्यांच्या, कृत्रिम रंगांच्या वापरावर तसंच फळांवर मेणाचं आवरण करण्याच्या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष अंमलबजावणी मोहीम राबवण्याचं आवाहन केलं आहे. कॅल्शियम कार्बाइड आदींचा बेकायदेशीर वापर रोखण्यासाठी प्राधिकरणांनं सर्व राज्ये आणि संघ प्रदेशांच्या अन्न सुरक्षा आयुक्तांना आणि प्राधिकरणाच्या प्रादेशिक संचालकांना फळांच्या बाजारांवर कठोरपणे लक्ष ठेवण्याची तसंच मानक कार्य...

September 13, 2024 12:33 PM

views 31

भेसळयुक्त मिठाई, मसालेदार आणि दुग्धजन्य पदार्थांवर कडक नजर ठेवण्याचे FSSAI चे निर्देश

सणासुदीच्या काळात भेसळयुक्त मिठाई, मसालेदार आणि दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मिती मोठ्या प्रमाणावर होतात. याला आळा घालण्याचे आणि विक्रीवर कडक नजर ठेवण्याचे निर्देश FSSAI, अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी वारंवार अंमलबजावणी आणि पाळत ठेवण्याची मोहीम राबवावी, अशा सुचनाही प्राधिकरणानं दिल्या आहेत. तसंच याला आळा घालण्यासाठी फिरती पथकं तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

August 27, 2024 12:13 PM

views 17

A1 आणि A2 प्रकारचं दूध आणि दुधाची उत्पादनांच्या पाकिटांवरील दावे तात्काळ काढून टाकण्यासंबंधीचा आदेश FSSAI कडून मागे

ए-वन आणि ए-2 प्रकारचं दूध आणि दुधाची उत्पादनांच्या पाकिटांवरील सर्व दावे तात्काळ काढून टाकण्यासंबंधी नुकताच दिलेला आदेश भारतीय अन्न सुरक्षितता आणि मानक प्राधिकरणानं मागे घेतला आहे. याबाबत संबंधितांशी आणखी विचारविनिमय आणि चर्चा करण्यासाठी हा आदेश मागे घेण्यात आला असल्याचं एफएसएसएआयनं म्हटलं आहे.

August 24, 2024 10:52 AM

views 18

दूध आणि दुधाची उत्पादनं यांच्या सर्व पाकिटांवरील A1 आणि A2 दावे काढून टाकण्याचे FSSAI चे आदेश

ए-वन आणि ए-2 प्रकारचं दूध आणि दुधाची उत्पादनं यांच्या सर्व पाकिटांवरील सर्व दावे तत्काळ काढून टाकावेत असा आदेश भारतीय अन्न सुरक्षितता आणि मानक प्राधिकरणानं दिला आहे. अन्न व्यवसाय कंपन्या FSSAI च्या परवाना क्रमांकाखाली दुध आणि दुधाची उत्पादनं ए-वन आणि ए-2 वर्गीकरणात विकत असल्यामुळं हा आदेश देण्यात आला आहे. दुधाचं ए-वन आणि ए-2 वर्गीकरण प्रथिनाच्या संरचनेतील फरकाशी निगडीत आहे त्यामुळे ए-2 चे कोणतेही दावे दिशाभूल करणारे आणि कायदेबाह्य असल्याचं प्राधिकरणानं स्पष्ट केलं आहे.