January 27, 2025 2:55 PM

views 25

दिल्ली निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाचा जाहीरनामा जाहीर

 दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी आज पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. सत्तेत आल्यावर ५ वर्षात १५ आश्वासनं पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. त्यात महिलांना दरमहा २१०० रुपयांची आर्थिक मदत, रोजगार निर्मिती, वैद्यकीय उपचारांसाठी संजीवनी योजना आणि थकित पाणी बिल माफ करणं यासारख्या घोषणांचा समावेश आहे. भाजपा आणि काँग्रेस दिल्लीतल्या नागरिकांना खोटी आश्वासनं देत असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान आम आदमी पक्षानं यापूर्वी दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्यानं ल...