August 6, 2024 8:09 PM

views 29

केदारनाथधाम परिसरात सुरु असलेलं बचाव कार्य जवळपास पूर्ण

उत्तराखंडमधल्या रुद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये केदारनाथधाम परिसरात सुरु असलेलं बचाव कार्य जवळपास पूर्ण झालं आहे, अशी माहिती उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी दिली. दरड कोसळण्याच्या घटना आणि अतिवृष्टीमुळे या भागात अडकलेल्या १२ हजारांहून अधिक यात्रेकरूंना विक्रमी वेळेत सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं, असंही त्यांनी सांगितलं.  केदारनाथधाम साठी उद्यापासून हेलिकॉप्टर सेवा बहाल केली जाणार असून  यात्रा मार्ग पूर्ववत करण्यासाठी सरकार जलद गतीनं काम करत असल्याचं ते म्हणाले.