May 9, 2025 1:27 PM

views 13

नवी दिल्लीतल्या आयकर कार्यालय परिसरात एअर रेड सायरनचा सराव होणार

नागरी संरक्षण संचालनालयाकडून आज नवी दिल्लीतल्या आयकर कार्यालय परिसरातल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्यालयात एअर रेड सायरनचा सराव घेण्यात येणार आहे. ही चाचणी दुपारी तीन वाजता सुरू होईल आणि ती पुढची १५ ते २० मिनिटं चालेल. या सरावादरम्यान, सामान्य जनतेने शांत राहावं, घाबरून जाऊ नये, असा सल्ला जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाने जाहीर केलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.