August 9, 2025 3:11 PM

views 13

ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतानं पाकिस्तानची सहा विमानं पाडल्याचं हवाई दलप्रमुखांचं निवेदन

ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतानं पाकिस्तानची सहा विमानं पाडल्याची माहिती हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह यांनी आज बेंगळुरू इथं एका व्याख्यानात दिली. यात पाकिस्तानी हवाई दलाच्या पाच, तर एका सूचना आणि नियंत्रण विमानाचा समावेश असल्याचंही त्यांनी सांगितलं. ही कारवाई जवळपास ३०० किलोमीटर अंतरावरून केल्याचं सांगून जमिनीवरून हवेत मारा करण्याचा हा उच्चांक असल्याचंही सिंह यांनी नमूद केलं.   शाहबाज जेकोकाबाद हवाई तळावर भारतानं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात काही विमानांचं नुकसान झाल्याचंही ते म्ह...

January 7, 2025 2:20 PM

views 20

विकसित भारताचं लक्ष्य २०४७ पर्यंत पूर्ण करण्यात संरक्षण आणि अवकाश तंत्रज्ञानाचा मोठा वाटा असेल – वायुसेनाप्रमुख ए. पी. सिंग

देशाच्या संरक्षणक्षेत्राला आत्मनिर्भर बनवण्यासाठी उत्तम दर्जाच स्वदेशी तंत्रज्ञान आणि उत्पादनक्षमता विकसित करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन वायुसेनाप्रमुख ए पी सिंग यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत ‘अवकाशक्षेत्रातील आत्मनिर्भरता’ या विषयावर आयोजित २१व्या सुब्रोतो मुखर्जी परिषदेचं उदघाटन करताना ते आज बोलत होते. विकसित भारताचं लक्ष्य २०४७ पर्यंत पूर्ण करण्यात संरक्षण आणि अवकाश तंत्रज्ञानाचा मोठा वाटा असेल आणि त्यासाठी संशोधनावर भर देण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.