September 30, 2024 7:31 PM September 30, 2024 7:31 PM
8
देशातल्या शेअर बाजारात जोरदार घसरण
गेल्या कित्येक दिवसांपासून उच्चांकी पातळी गाठत असलेल्या देशातल्या शेअर बाजारात आज जोरदार घसरण दिसून आली. व्यवहार सुरू झाले तेव्हापासून सुरू झालेली ही घसरण सातत्याने वाढत गेली. सेन्सेक्स दिवसअखेर १ हजार २७२ अंकांनी घसरुन ८४ हजार ३०० अंकांवर आणि निफ्टी ३६८ अंकांनी घसरुन २५ हजार ८११ अंकांवर बंद झाला. आशियाई बाजारातल्या घसरणीचा परिणाम देशातल्या शेअर बाजारांवर दिसून येतोय. विदेशी संस्थांत्मक गुंतवणूकदारांकडून होत असलेल्या विक्रीचा फटकाही बाजाराला बसला.