April 15, 2025 8:37 AM April 15, 2025 8:37 AM
6
सिंधुदुर्गमधल्या किल्ल्यांच्या अभ्यासासाठी मुंबई विद्यापिठात स्वतंत्र अध्यासन केंद्र सुरू करणार असल्याची सांस्कृतिक कार्यमंत्र्यांची माहिती
सिंधुदुर्गमधल्या सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, राजकोट, आणि सर्जेकोट या चार किल्ल्यांचा अभ्यास करण्यासाठी मुंबई विद्यापिठात स्वतंत्र अध्यासन केंद्र सुरू करणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी काल जाहीर केली. त्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ५० लाख रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. सिंधुदुर्ग किल्ल्याला, 12 एप्रिल रोजी ३५८ वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. या चार किल्ल्यांबद्दल अजूनही मोठ्या प्रमाणात माहिती जनतेसमो...