April 1, 2025 1:54 PM April 1, 2025 1:54 PM

views 11

नव्या आर्थिक वर्षाच्या आजच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात तीव्र घसरण

नव्या आर्थिक वर्षाला आजपासून सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात तीव्र घसरण झालेली पहायला मिळाली. सकाळी बाजार सुरू झाल्यानंतर काही वेळातच मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १ हजारांहून अधिक अंकांनी घसरला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी तीनशेहून अधिक अंकांनी घसरला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प विविध कर आणि शुल्क लावण्याच्या घोषणा करत असल्याच्या पार्श्वभूमीवर तसंच जागतिक पातळीवर इंधन तेलांचे दर वाढत असल्यानं त्याचा एकंदर परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत असल्याचं बाजार...

October 29, 2024 7:28 PM October 29, 2024 7:28 PM

views 8

जागतिक अस्थिरतेच्या परिणामांच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारांमध्ये वाढ

जागतिक अस्थिरतेच्या परिणामांच्या पार्श्वभूमीवर आजही भारतीय शेअर बाजारांमध्ये वाढ दिसून आली. दुपारच्या सत्रापर्यंत घट होत असताना बाजार बंद होताना वाढ पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज ३६४ अंकांची वाढ झाली आणि तो ८० हजार ३६९ अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १२८ अंकांची वाढ नोंदवून २४ हजार ४६६ अंकांवर बंद झाला.

August 26, 2024 7:18 PM August 26, 2024 7:18 PM

views 6

शेअर बाजारात तेजी, निफ्टी पुन्हा २५ हजाराच्या वर

भारतीय शेअर बाजारांमध्ये आज तेजी पाहायला मिळाली. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनं २५ हजाराचा टप्पा पुन्हा ओलांडला. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे आज ६१२ अंकांची वाढ  झाली आणि तो ८१ हजार ६९८ अंकांवर बंद झाला. तर निफ्टी १८७ अंकांची वाढ नोंदवत २५  हजार ११ अंकांवर बंद झाला.

July 23, 2024 1:56 PM July 23, 2024 1:56 PM

views 11

शेअर बाजारातल्या नफ्यावर अतिरीक्त कराची अर्थसंकल्पात तरतूद

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांवर अतिरीक्त कर लादण्याचा प्रस्ताव आजच्या अर्थसंकल्पात सादर झाला आहे. त्यामुळं लघु मुदतीच्या नफ्यावर १५ ऐवजी २० टक्के आणि दीर्घ मुदतीच्या नफ्यावर १० ऐवजी साडे १२ टक्के दराने कर द्यावा लागेल. कमी किंवा मध्यम उत्पन्न असणाऱ्यांना सध्या १ लाख रुपयांपर्यंतचा नफा करमुक्त असतो. ही मर्यादा वाढवून आता सव्वा लाख होणार आहे. डेब्ट म्युच्युअल फंडांवरही आता कर द्यावा लागेल. शेअर बाजारात फ्युचर्सचे व्यवहार करणाऱ्यांना आता २ शतांश टक्के आणि ऑप्शनवर १ दशांश टक्के दराने कर द्यावा लाग...

July 4, 2024 12:16 PM July 4, 2024 12:16 PM

views 9

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २४ हजारांपार

भारतीय शेअर बाजारांनी आज पुन्हा विक्रमी पातळी गाठली. व्यवहाराच्या सुरुवातीला मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने ११४ अंकांची वाढ नोंदवत ८० हजारांची पातळी ओलांडली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने ३९ अंकांची वाढ नोंदवत २४ हजारांपार गेले.

June 18, 2024 7:34 PM June 18, 2024 7:34 PM

views 24

देशातल्या दोन्ही शेअर बाजार आज विक्रमी पातळीवर बंद

देशातल्या दोन्ही शेअर बाजार आज विक्रमी पातळीवर बंद झाले. सेन्सेक्स पहिल्यांदाच ७७ हजारांच्या वर आणि निफ्टीही पहिल्यांदाच २३ हजार ५०० अंकांच्यावर स्थिरावला. व्यवहार सुरू झाले तेव्हापासून सेन्सेक्स ७७ हजारांच्या आणि निफ्टी २३ हजार ५०० च्या वर व्यवहार करत होते. दिवसभर बाजारात हे सातत्य कायम राहिलं आणि दिवसअखेर सेन्सेक्स ३०८ अंकांची तेजी नोंदवून ७७ हजार ३०१ अंकांवर स्थिरावला.  निफ्टी ९२ अंकांची तेजी नोंदवून २३ हजार ५५८ अंकांवर बंद झाला. मतमोजणीच्या दिवसापासून अवघ्या ८ सत्रांमध्ये सेन्सेक्सनं ५ हजारा...

June 18, 2024 7:10 PM June 18, 2024 7:10 PM

views 11

लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर शेअर बाजारात आलेल्या तेजीप्रकरणी इंडिया आघाडीच्या खासदारांची सेबीकडे तक्रार

लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर शेअर बाजारात आलेल्या तेजीप्रकरणी इंडिया आघाडीच्या खासदारांनी आज सेबीकडे तक्रार केली. हे एक्झिट पोल राजकीय हेतूने प्रेरित होते, त्यांनी शेअर बाजारात हस्तक्षेप केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी, सागरिका घोष, साकेत गोखले आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे. निकाल जाहीर झाले त्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण झाली. त्यामुळं गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी सेबी...