August 19, 2024 6:33 PM August 19, 2024 6:33 PM

views 6

मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेऊ देत नसल्याचा जरांगे पाटील यांचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी फेटाळला

मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेऊ देत नसल्याचा मनोज जरांगे पाटील यांचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी फेटाळला आहे. मराठा आरक्षण तसंच सगेसोयऱ्यांच्या मुद्दयावर मुख्यमंत्री शिंदे यांना काम करायचं आहे, निर्णय घ्यायचा आहे मात्र त्यांना देवेंद्र फडनवीस काम करू देत नसल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. त्यावर फडनवीस यांनी आज बातमीदारांशी बोलताना उत्तर दिलं. मराठा समाजासाठी आजपर्यंत जे काही निर्णय झाले ते एक तर मी केले, किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्य...

August 14, 2024 8:17 PM August 14, 2024 8:17 PM

views 9

गणेशोत्सवानिमित्त गावी जाणाऱ्या गणेश भक्तांना यंदाही टोलमाफी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

येत्या गणेशोत्सवानिमित्त गावी जाणाऱ्या गणेश भक्तांना यंदाही टोलमाफीचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केला. येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी मुंबईत बैठक झाली, तेव्हा ते बोलत होते. राज्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवावेत तसंच कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी असे विविध निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी या बैठकीत दिले.   गेल्या वर्षी ज्या सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी दिली होती, ती य...

July 22, 2024 7:30 PM July 22, 2024 7:30 PM

views 6

जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास उमेदवारांना सहा महिन्यांचा कालावधी

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. यामुळे आता अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांपर्यंत हे विद्यार्थी जात वैधता प्रमाणपत्रं सादर करू शकतील. विशेषतः मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रंमिळण्यात येणाऱ्या अडचणी या निर्णयामुळे दूर होणार आहेत.

July 3, 2024 8:28 PM July 3, 2024 8:28 PM

views 16

रत्नागिरीत देशातलं पहिलं सागरी विद्यापीठ उभारायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंजुरी

रत्नागिरीत देशातलं पहिलं सागरी विद्यापीठ उभारायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी थोड्या वेळापूर्वी दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. रत्नागिरीत शासकीय विधी महाविद्यालय उभारायलाही मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिल्याचं सामंत यांनी सांगितलं. सागरी विद्यापीठाच्या उभारणीसाठी पाचशे ते सहाशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याचा शासन आदेश निघाल्यानंतर त्यासाठी जिल्हाधिकारी ३० दिवसांत रत्नागिरी तालुक्यात ५० एकर जागा उपलब्ध ...