December 4, 2024 9:36 AM December 4, 2024 9:36 AM

views 9

महापरिनिर्वाणदिनाच्या तयारीमध्ये कोणतीही कमतरता राहू नये, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर इथं चैत्यभूमीवर होणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत घेतला. महापरिनिर्वाणदिनाच्या तयारीमध्ये कोणतीही कमतरता राहू नये असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.  

October 10, 2024 10:58 AM October 10, 2024 10:58 AM

views 37

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरुपी सुरु राहणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना कायमस्वरुपी सुरु राहणार आहे. या योजनेसाठी 46 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसंच सध्या दिली जात असलेली दरमहा 1 हजार 500 रुपयांची रक्कम वाढवत जाऊन टप्प्याटप्प्याने ही रक्कम तीन हजार रुपयांपर्यंत करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल राज्यस्तरीय वचनपूर्ती कार्यक्रमात रायगड जिल्ह्यातील मोर्बा इथं दिली.  

October 3, 2024 7:15 PM October 3, 2024 7:15 PM

views 14

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बुलडाणा जिल्ह्यातल्या वेद विद्यालयाच्या नव्या वास्तूचं भूमिपूजन

बुलडाणातल्या खामगाव इथल्या महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान अंतर्गत जय जगदंबा वेद विद्यालयाच्या नव्या वास्तुचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वेद विद्यालयाच्या नव्या वास्तूचं भूमिपूजन करून कोनशिलेचं अनावरण केलं. त्यानंतर त्यांनी वारकरी संप्रदायाशी संवाद साधला. या कार्यक्रमाला केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमीचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.

September 28, 2024 7:13 PM September 28, 2024 7:13 PM

views 12

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोल्हापूरातून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेला सुरुवात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज कोल्हापुरातून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीमार्फत या योजनेतल्या पहिल्या कोल्हापूर ते अयोध्या या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला. या पहिल्या रेल्वेगाडीतून ८०० ज्येष्ठ नागरिक रवाना झाले असून आपली वडीलधारी मंडळी ही आपली जबाबदारी असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

September 24, 2024 7:12 PM September 24, 2024 7:12 PM

views 8

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ३ हजार ८३८ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी

पुणे शहराची सांस्कृतिक शहर म्हणून ओळख कायम ठेऊन शहराचा विकास व्हावा, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.  ते आज मुंबईत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत बोलत होते. यावेळी प्राधिकरणाच्या ३ हजार ८३८ कोटी ६१ लाख रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. ५ कोटी ७५ लाखांचा शिलकीचा हा अर्थसंकल्प आहे.  नवीन विकसित होणाऱ्या भागात मोकळ्या जागा राहतील, याची काळजी घ्या. पुण्यातलं कव्हेशन सेंटर जागतिक दर्जाचं होण्यासाठी नियोजन करा, गुंठेवारी अधिनियमातल्या नियमितीकरणाचं शुल्क कम...

September 24, 2024 7:05 PM September 24, 2024 7:05 PM

views 18

मुंबई महानगर क्षेत्रातल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई महानगर क्षेत्रातलं दळणवळण, पायाभूत सुविधा, आणि आर्थिक विकास वाढवण्याच्या प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. एमएमआरडीएच्या माध्यमातून सुमारे अडीच लाख कोटींची विकास कामे सुरू असून ती कालमर्यादेत पूर्ण करावीत, असंही ते म्हणाले. बॅकबे रिक्लेमेशन प्रारूप विकास आराखडा, बदलापूर ते विरार-अलिबाग मल्टीमोडल कॉरीडॉर प्रवेश नियंत्रित महामार्गासाठी सल्लागाराची नेमणूक आदी विषयांना यावेळी मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. बॅकबे रिक्लेमेशन योजनेचा सुधारित प्रारुप आराखडाही ...

September 24, 2024 8:39 PM September 24, 2024 8:39 PM

views 14

तीर्थक्षेत्र विकासाच्या ३०५ कोटी ६३ लाख रुपयांच्या आराखड्यांना राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत मंजुरी

राज्यातल्या विविध तीर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळ विकासाच्या सुमारे ३०५ कोटी ६३ लाख रुपयांच्या आराखड्यांना सरकारनं मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत ही मंजूरी देण्यात आली. यात पंढरपूरमधे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात भाविक आणि पर्यटकांसाठी दर्शन मंडप आणि दर्शन रांगेची सुविधा निर्माण करण्यासाठी १२९ कोटी ४९ लाख रुपयांच्या कामांचा समावेश आहे.  त्याशिवाय जळगाव जिल्ह्यात अमळनेर इथल्या मंगळग्रह देवस्थानासाठी २५ कोटी, सातारा जिल्ह्य...

September 19, 2024 6:32 PM September 19, 2024 6:32 PM

views 13

वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरम’कडून मुख्यमंत्र्यांना जागतिक कृषी पुरस्कारानं सन्मानित

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी केलेल्या कामाबद्दल ‘वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरम’कडून जागतिक कृषी पुरस्कारानं  काल सन्मानित करण्यात आलं. मुंबईत एनसीपीएच्या सभागृहात झालेल्या या समारंभात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.  जागतिक बांबू दिनाच्या औचित्यानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. 

September 19, 2024 4:47 PM September 19, 2024 4:47 PM

views 15

बुलढाणा शहरात २६ स्मारकांचं लोकार्पण

बुलडाणा इथं आज छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह बुलढाणा शहरात २६ स्मारकांचं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत झालं. त्यानंतर मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत.

August 26, 2024 8:06 PM August 26, 2024 8:06 PM

views 7

मुंबई – गोवा महामार्ग गणेशोत्सवापूर्वी खड्डेमुक्त केला जाईल, असं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

मुंबई - गोवा महामार्ग गणेशोत्सवापूर्वी खड्डेमुक्त केला जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. त्यांनी आज सार्वजनुक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत मुंबई - गोवा महामार्गाची पाहणी केली. त्यानंतर बातमीदारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की काही कंत्राटदारांमुळे महामार्गाचं काम रखडलं, त्यांच्यावर तसंच संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. खड्डे लवकर भरले जावेत यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं.