April 5, 2025 3:40 PM April 5, 2025 3:40 PM

views 12

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागानं आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांचा इशारा दिला आहे. तसंच ९ एप्रिल पर्यंत कोकण आणि गोव्यात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता वर्तवली आहे.

September 27, 2024 12:55 PM September 27, 2024 12:55 PM

views 7

कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रासह सौराष्ट्र आणि कच्छ भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज

भारतीय हवामान विभागाने आज कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रासह सौराष्ट्र आणि कच्छ भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पश्चिम बंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, झारखंड आणि बिहारमध्ये आजही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून उत्तराखंड, पूर्वांचल तसंच हिमाचल प्रदेशात अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

September 24, 2024 7:24 PM September 24, 2024 7:24 PM

views 8

रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी

रत्नागिरी जिल्ह्यात बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर काल पावसानं जोरदार हजेरी लावली. आज सकाळपर्यंत जिल्ह्यात संगमेश्वरमध्ये सर्वाधिक ७३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. रत्नागिरी आज संध्याकाळपासून पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा जोर कायम आहे. भुईबावडा घाटात काल दरड कोसळली होती. आज संध्याकाळ पर्यंत दरड हटवून मार्ग मोकळा केला आहे. मात्र अवजड वाहनांसाठी हा घाट बंद ठेवला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागानं दिली आहे. परभणी जिल्ह्यात ही विजेच्या कडकडाटासह मुसळधार प...