June 29, 2024 6:53 PM June 29, 2024 6:53 PM

views 10

हिवताप , डेंगी, आजारांच्या प्रतिबंधासाठी मुंबई महानगरपालिकेची जनजागृती मोहीम

मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीनं हिवताप, डेंगी आजारांच्या प्रतिबंधासाठी ‘ भाग मच्छर भाग’ ही विशेष जनजागृती मोहीम राबवत आहे. साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ति होऊन डासांमार्फत हे आजार होतात. म्हणून नागरिकांनी घराच्या आसपास पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी तसंच ताप आल्यास त्वरित वैद्यकीय उपचार घ्यावेत असे निर्देश महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले. या मोहिमेत मराठी आणि हिन्दी चित्रपट सृष्टीतले अभिनेते लघुपटांच्या माध्यमातून सहभागी होतील.