December 5, 2024 2:39 PM December 5, 2024 2:39 PM

views 7

झारखंड मध्ये विस्तारीत मंत्रीमंडळाच्या सदस्यांचा आज रांचीत शपथविधी

झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालच्या इंडिया आघाडीच्या सरकारच्या विस्तारित मंत्रिमंडळाच्या सदस्यांचा शपथविधी आज रांची इथं होणार आहे. राज्यपाल संतोषकुमार गंगवार अकरा मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ देतील. त्यात झारखंड मुक्ती मोर्चाचे चार, काँग्रेसचे चार, तर राष्ट्रीय जनता दलाच्या एका मंत्र्याचा समावेश असेल.

November 12, 2024 8:27 PM November 12, 2024 8:27 PM

views 11

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उद्या मतदान

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उद्या मतदान  होत आहे. या टप्प्यात ४३ मतदारसंघात मतदान होणार असून त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी २२५ संवेदनशील मतदान केंद्रांसह एकूण १५ हजार ३४४ मतदान केंद्र उभारली आहेत. सुरक्षा दलाच्या दोनशेहून अधिक तुकड्या तैनात आहेत. सकाळी सात ते संध्याकाळी ५ या कालावधीत मतदान होईल. आसाम विधानसभेच्या पाच, बिहार विधानसभेच्या चार, कर्नाटकातल्या ३ जागांसाठी तर केरळात लोकसभा आणि विधानसभेच्या प्रत्येकी एका जागेसाठी उद्या होणाऱ्या मतदानाची तयारी पूर्ण झाली आ...

November 11, 2024 10:30 AM November 11, 2024 10:30 AM

views 7

झारखंडमध्ये राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांचा मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न

झारखंडमध्ये, राज्य विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचारासाठी केवळ एक दिवस शिल्लक असताना विविध राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते त्यांच्या उमेदवारांना पाठिंबा मिळवण्यासाठी शेवटचे प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी काल गुमला आणि बोकारो इथं जाहीर सभांना संबोधित केले. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार 'सबका साथ, सबका विकास' या मंत्राशी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. मोदी यांनी झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसवर टीका करताना सांगितलं की त्यांचे हेत...

November 10, 2024 1:49 PM November 10, 2024 1:49 PM

views 6

झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी प्रचार शिगेला

झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी प्रचार शिगेला पोहोचला आहे. एनडीए आणि  इंडिया या दोन्ही आघाड्यांचे नेते आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या बाजूने मतदारांना आकर्षित करण्यासाठी राज्यभर झंझावाती दौरे करत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज बोकारो इथं सभा घेत असून गढवा  इथंही त्यांची प्रचारसभा होणार आहे, तर रांची मधे ते रोड शो करणार आहेत. मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री मोहन यादव तसंच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान प्रत्येकी तीन सभा घेणार आहेत, तर भाज...

November 9, 2024 6:59 PM November 9, 2024 6:59 PM

views 12

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठीचा प्रचार शिगेला

झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातलं मतदान १३ नोव्हेंबरला होणार आहे, त्यामुळं तिथं प्रचार संपायला अवघे तीन दिवस उरले आहेत. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा आज झारखंडच्या जमशेदपूरमधील छत्रपूर, हजारीबाग आणि पोटका विधानसभा मतदारसंघात जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज धनबाद जिल्ह्यात बागमारा विधानसभा मतदारसंघ आणि पूर्व सिंगभूम जिल्ह्यात जमशेदपूर इथं निवडणूक प्रचार सभा घेणार आहेत. झारखंड मुक्ती मोर्चाचे ज्येष्ठ नेते आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या सभा रा...

November 6, 2024 11:02 AM November 6, 2024 11:02 AM

views 12

झारखंडमध्ये भारतीय जनता पार्टीनं तीस नेत्यांना पक्षातून केलं बडतर्फ

झारखंडमध्ये भारतीय जनता पार्टीनं तीस नेत्यांना पक्षातून बडतर्फ केलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांविरुद्ध बंडखोर म्हणून उभे राहिल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. चंद्रमाकुमारी, कुकुमदेवी, जुलीदेवी, बलवंतसिंह, बांकेबिहारी यांच्यासह तीस जणांना बडतर्फ करण्यात आलं आहे. झारखंडमध्ये येत्या तेरा आणि वीस तारखेला मतदान होणार आहे.

October 20, 2024 6:52 PM October 20, 2024 6:52 PM

views 7

आचारसंहिता लागू झाल्यापासून झारखंडच्या विविध भागातून सुमारे ३ कोटी १५ लाख रुपये जप्त

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाल्यापासून झारखंडच्या विविध भागातून आतापर्यंत अवैध वस्तू आणि रोख रकमेच्या स्वरुपात सुमारे ३ कोटी १५ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी के रवीकुमार यांनी अधिकाऱ्यांना आचारसंहितेच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत

October 19, 2024 1:05 PM October 19, 2024 1:05 PM

views 12

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठीचं राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या जागा जाहीर

 झारखंड विधानसभा निवडणूकीसाठी इंडिया आघाडीच्या हालचालींना वेग आला आहे. काँग्रेस नेते राहुल गाधी आज रांची इथं पोहोचत असून ते यावेळी सहयोगी झारखंड मुक्ती मोर्चा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांबरोबर चर्चा करतील. राजद नेते तेजस्वी प्रसाद यादवही झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याशी बैठक करणार आहेत.   राष्ट्रीय लोकशाही दल अर्थात एनडीएचा जागावाटपाचे सूत्र ठरले असून भाजपा ६८ जागांवर तर इतर मित्र पक्ष उर्वरित जागांवर निवडणूक लढवणार आहेत. पहिल्या टप्प्याच्या मतदा...

October 15, 2024 3:58 PM October 15, 2024 3:58 PM

views 13

केंद्रीय निवडणूक आयोग आज महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकींच्या कार्यक्रमाची करणार घोषणा

महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकींची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोग आज करणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग दुपारी साडेतीन वाजता नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत या दोन्ही राज्यांचं निवडणूक वेळापत्रक जाहीर करेल. त्यानंतर लगेचच आचारसंहिता लागू होईल. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ पुढील महिन्याच्या २६ तारखेला तर झारखंडचा जानेवारीच्या ५ तारखेला संपणार आहे. २०१९मध्ये राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदान होऊन २४ ऑक्टोबरला मतमोजणी झाली होती. त्यावेळी ६१ पूर्णांक ४ शतांश टक्के मतदान झाल...

October 2, 2024 7:56 PM October 2, 2024 7:56 PM

views 14

आदिवासी समाजाची वेगानं प्रगती झाली तरच देशाचा विकास होईल या वचनानुसार केंद्र सरकार कार्यरत – प्रधानमंत्री

आदिवासी समाजाची वेगानं प्रगती झाली तरच देशाची प्रगती होईल या महात्मा गांधींच्या वचनानुसार केंद्र सरकार कार्य करत आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज झारखंडमध्ये हजारीबाग इथं सुमारे ८३ हजार ३०० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी, लोकार्पण आणि उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते.  झारखंडच्या सर्वांगीण विकासाकरता केंद्रसरकार वचनबद्ध आहे, भाजपाची परिवर्तन यात्रा म्हणजे झारखंडच्या विकासाची संकल्प यात्रा आहे, असं त्यांनी सांगितलं.     आपलं सरक...