June 29, 2024 7:24 PM June 29, 2024 7:24 PM
1
विधानपरिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक लवकरात लवकर जाहीर करण्याची विरोधकांची मागणी
विधानपरिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक लवकरात लवकर जाहीर करावी अशी मागणी आज विरोधकांनी विधानपरिषदेत केली. गेले अनेक दिवस विधानपरिषदेचं सभापतीपद रिक्त आहे हे संविधानाला धरून नाही असं सांगत शेकापचे जयंत पाटील यांनी आज कामकाज सुरू होताच हा मुद्दा उपस्थित केला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील जयंत पाटील यांच्या मुद्द्याला समर्थन देत लवकरात लवकर निवडणूक घेण्याची मागणी केली. चर्चेच्या माध्यमातून सर्वसहमतीनं देखील सभापती निवडण्याची विरोधकांची तयारी आहे, असं ते म्हणाले. या संदर्भात निर्णय घेण्यास...