September 9, 2024 6:51 PM September 9, 2024 6:51 PM
13
हिंगोली आणि पालघर जिल्ह्यात एक गाव एक गणपती ही संकल्पना कायम
हिंगोली जिल्ह्यातल्या ३०५ गावांनी एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून ही संकल्पना सुरू झाली. धुळे जिल्ह्यात माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा केला जात आहे. गेल्या वर्षाचा तुलनेत यंदा घरगुती आणि सार्वजनिक मंडळांमध्ये पर्यावरण पूरक गणेशाची स्थापना मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यातल्या उर्से गावातही एक गाव एक गणपती ही संकल्पना गेल्या ५१ वर्षांपासून सुरू आहे.