January 22, 2025 10:04 AM January 22, 2025 10:04 AM

views 14

येत्या २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिनी काँग्रेस पक्षाचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

येत्या २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिनी काँग्रेस पक्षानं राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. राज्यात ५० लाख मतं कशी वाढली याची माहिती निवडणूक आयोग देत नाही, म्हणून आम्ही आंदोलन करणार असल्याचं, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी सांगितलं. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात आंदोलन करून, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देणार असल्याची माहिती पटोले यांनी दिली.

December 12, 2024 2:17 PM December 12, 2024 2:17 PM

views 16

अदानी लाचखोरी प्रकरणी संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशीच्या मागणीसाठी विरोधी पक्षाचं आंदोलन

अदानी लाचखोरी प्रकरणी संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशीच्या मागणीसाठी आज संसद परिसरात विरोधी पक्षानं आंदोलन केलं. या आंदोलनात काँग्रेस, मार्क्सवादी आणि इतर विरोधी पक्षाचे खासदार सहभागी झाले होते.  

July 28, 2024 8:19 PM July 28, 2024 8:19 PM

views 16

बांग्लादेशात सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण सुधारणांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पुढचा कृती कार्यक्रम जाहीर

बांग्लादेशात सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण सुधारणांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यानी त्यांचा पुढचा कृती कार्यक्रम जाहीर केला. भेदभाव विरोधी चळवळीच्या रिफत रशीद, अब्दुल हनान मसुद आणि माहीन सारकर या समन्वयकांना त्यांच्या साथीदारांसाहित पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.   आरक्षण सुधारणांसाठी आयोगाची निर्मिती, खोटे गुन्हे नोंदवून अटक केलेल्या आंदोलकांची सुटका, हिंसाचारात सहभाग असणाऱ्या मंत्री आणि अधिकाऱ्यांना बडतर्फ करणं अशा विविध मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत. १४ देशांनी संयुक्तपणे पत्राद्वा...

July 24, 2024 7:03 PM July 24, 2024 7:03 PM

views 17

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. जालनाच्या आंतरवाली सराटी इथं गेल्या पाच दिवसांपासून त्यांचं आमरण उपोषण सुरू आहे. सरकारचा जीव ज्या खुर्चीत अडकला आहे, ती खुर्ची मिळवण्याच्या तयारीला आम्ही लागणार आहोत, असं जरांगे यांनी वार्ताहरांशी बोलताना म्हणाले.

July 14, 2024 3:36 PM July 14, 2024 3:36 PM

views 1

अहमदनगर : श्रीरामपूर जिल्ह्याची निर्मिती करावी या मागणीसाठी आंदोलन

राज्यात भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठा आणि प्रशासकीय दृष्ट्या गैरसोयीचा असलेल्या अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन करुन गुणवत्तेच्या आधारे श्रीरामपूर जिल्ह्याची निर्मिती करावी या मागणीसाठी आज श्रीरामपूरमधे आंदोलन करण्यात आलं. अहमदनगर जिल्ह्याच्या विभाजनाचा प्रस्ताव गेल्या चाळीस वर्षांपासून प्रलंबित आहे. श्रीरामपूर जिल्हा निर्मितीची शिफारस जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांनी राज्य सरकारकडे १९९८ मध्ये केली आहे.

June 14, 2024 8:45 AM June 14, 2024 8:45 AM

views 15

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण स्थगित

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी गेल्या सहा दिवसांपासून सुरु असलेलं उपोषण काल मागे घेतलं. सरकारी शिष्टमंडळानं काल आंतरवाली सराटी इथं जाऊन जरांगे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. या शिष्टमंडळात छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे, मंत्री शंभुराज देसाई, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा समावेश होता. मराठा समाजाला आरक्षण देताना सगेसोयरेसंदर्भातली अंमलबजावणी करण्याची जरांगे यांची मागणी असून, सरकारला एक महिन्याचा वेळ द्यावा, या काळात मागण्यांबाबत निर्णय घेण्यात येईल, असं आ...