February 7, 2025 3:42 PM

views 16

लोकसभेत आगामी आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पावर चर्चा सुरू

आगामी आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पावर आज लोकसभेत चर्चा झाली. चर्चेला सुरुवात करताना, केंद्रीय अर्थसंकल्प देशासमोरच्या कृषी आव्हानांना तोंड देण्यात अपयशी ठरला आहे, अशी टीका काँग्रेसचे धर्मवीर गांधी यांनी केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. देशात शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळत नसल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे नेते शिवपाल सिंह यांनी केला. एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्याचा मुद्दा तृणमूलच्या अभिषेक बॅनर्जी यांनी उपस्थित केला. केंद्रीय अर्थसंकल्पात पश्चिम बंगालला ...

July 29, 2024 3:34 PM

views 27

प्रधानमंत्री उद्या ‘विकसित भारताच्या दिशेने वाटचाल-केंद्रीय अर्थसंकल्पोत्तर परिषदे’ला संबोधित करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्ली इथं ‘विकसित भारताच्या दिशेने वाटचाल - केंद्रीय अर्थसंकल्पोत्तर परिषदे’ला संबोधित करणार आहेत. कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीनं या परिषदेचं आयोजन केलं आहे. सरकारच्या दूरदर्शी योजना आणि या प्रवासात उद्योगांची भूमिका याचा आराखडा सादर करण्याचा या परिषदेचा उद्देश आहे. उद्योग, सरकार, राजनैतिक अधिकारी, वैचारिक मंच यांच्यासह एक हजारापेक्षा जास्त जण या परिषदेत सहभागी होणार आहेत.

July 29, 2024 4:58 PM

views 32

संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा

संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज केंद्रीय अर्थसंकल्पावरची चर्चा पुढे सुरू आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २३ जुलै रोजी अर्थसंकल्प सादर केला होता. त्यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. देशात नोकऱ्यांची कमतरता नसून सरकारच्या विविध धोरणात्मक पावलांमुळे देशातला बेरोजगारीचा दर ३ पूर्णांक २ दशांश टक्क्यांपर्यंत खाली आल्याचं प्रतिपादन कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आज लोकसभेत केलं. प्रश्नोत्तराच्या तासाला पुरवणी प्रश्नांना ते उत्तर देत होते. येत्या...

July 28, 2024 7:45 PM

views 36

२०२४चा केंद्रीय अर्थसंकल्प सर्वसमावेशक आणि देशासाठी अमृत पिढी घडवणारा असल्याचं मंत्री पियुष गोयल यांचं प्रतिपादन

२०२४चा केंद्रीय अर्थसंकल्प सर्वसमावेशक आणि देशासाठी अमृत पिढी घडवणारा असल्याचं प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे. या अर्थसंकल्पाचा फायदा देशाच्या १४० कोटी जनतेला मिळणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना केला. या अर्थसंकल्पात फक्त गरिबांचं नाही, तर शेतकरी, युवा आणि महिलांचंही हित साधलं जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

July 25, 2024 3:48 PM

views 28

अभिजित गंगोपाध्याय यांच्या वक्तव्याविरोधात काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसचा आक्षेप

लोकसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेदरम्यान काल भाजपा सदस्य अभिजित गंगोपाध्याय यांनी केलेल्या वक्तव्या विरोधात काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसनं आज आक्षेप नोंदवला. सकाळी सदनाचं कामकाज सुरु झाल्यावर काँग्रेस आणि टीएमसीच्या सदस्यांनी गंगोपाध्याय यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करत हा मुद्दा उपस्थित केला. गंगोपाध्याय यांचं वक्तव्य अयोग्य असून ते सभागृहाच्या प्रतिष्ठे विरोधात असल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले. गंगोपाध्याय यांना त्यांच्या वक्तव्याबद्दल इशारा देण्यात आल्याचं सभापती ओम ब...

July 23, 2024 2:16 PM

views 24

अर्थसंकल्प २०२४ : जमीन सुधारणा आणि व्यवस्थापनसंबंधी नवे नियम लागू करण्याची घोषणा

ग्रामीण आणि शहरी भागात जमीन सुधारणा आणि व्यवस्थापनसंबंधी नवे नियम लागू करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. पुढच्या तीन वर्षात ही व्यवस्था लागू करण्यात येईल.   ग्रामीण भागातल्या जमिनीच्या व्यवहारासाठी भू आधार कार्ड किंवा युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर देण्यात येईल, तसंच नकाशांचं डिजिटायजेशन करण्यात येईल. यामुळे कर्ज आणि इतर कृषी सुविधांचा लाभ मिळणं सहज होणार आहे.    शहरी भागातल्या जमिनींचं जीआयएस मॅपिंगद्वारे डिजिटायजेशन करण्यात येणार आहे. तसंच मालमत्ता नोंदणी व्यवस्था, कर...

July 23, 2024 8:14 PM

views 20

अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी १ लाख ५२ हजार कोटी रुपयांची तरतूद

मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातल्या पहिल्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्पात कृषी आणि संबंधित क्षेत्रांसाठी १ लाख ५२ हजार कोटी रुपयांची तरतूद आहे. शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी आणि बदलत्या हवामानानुसार बियाणांच्या वाणाची निर्मिती करण्यासाठी सर्वसमावेशक कृषी संशोधन यंत्रणेचा पुनर्परीक्षण करण्यात येईल, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी संसदेत अर्थसंकल्प मांडतानाच्या भाषणात सांगितलं.  सरकार आणि तज्ञ यावर देखरेख करणार आहेत. तेलबिया, कडधान्यं या बाबतीत...

July 23, 2024 1:56 PM

views 40

शेअर बाजारातल्या नफ्यावर अतिरीक्त कराची अर्थसंकल्पात तरतूद

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांवर अतिरीक्त कर लादण्याचा प्रस्ताव आजच्या अर्थसंकल्पात सादर झाला आहे. त्यामुळं लघु मुदतीच्या नफ्यावर १५ ऐवजी २० टक्के आणि दीर्घ मुदतीच्या नफ्यावर १० ऐवजी साडे १२ टक्के दराने कर द्यावा लागेल. कमी किंवा मध्यम उत्पन्न असणाऱ्यांना सध्या १ लाख रुपयांपर्यंतचा नफा करमुक्त असतो. ही मर्यादा वाढवून आता सव्वा लाख होणार आहे. डेब्ट म्युच्युअल फंडांवरही आता कर द्यावा लागेल. शेअर बाजारात फ्युचर्सचे व्यवहार करणाऱ्यांना आता २ शतांश टक्के आणि ऑप्शनवर १ दशांश टक्के दराने कर द्यावा लाग...

July 23, 2024 1:44 PM

views 20

अर्थसंकल्पात युवांसाठी महत्त्वाच्या योजनांची घोषणा

युवांसाठी रोजगारनिर्मिती आणि कौशल्यविकासाच्या दृष्टीने सरकारच्या पाच योजना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात जाहीर केल्या.   अर्थसंकल्पात युवांसाठी महत्त्वाच्या योजना :    नोकरीच्या सुरुवातीला आर्थिक सहाय्य, उत्पादन क्षेत्रात रोजगारनिर्मिती, नोकरी देणाऱ्यांना आर्थिक सहाय्य, महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी महिला-केंद्रित कौशल्यविकास, महिलांसाठी वसतिगृहं, तसंच पाळणाघरांची उभारणी इत्यांदीचा समावेश आहे.   कौशल्यविकासासाठी कर्जं, शैक्षणिक कर्जं या क्षेत्रातही सरकारनं नवीन योजना...

July 23, 2024 8:48 AM

views 37

यंदाचा अर्थसंकल्प देशाच्या पुढच्या पाच वर्षांची दिशा ठरवणारा असेल – प्रधानमंत्र्यांचा विश्वास

संसदेत सादर होणारा यंदाचा अर्थसंकल्प देशाच्या पुढच्या पाच वर्षांची दिशा ठरवणारा असेल; 2047 मध्ये विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठीचा पाया या अर्थसंकल्पातून घातला जाईल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी त्यांनी संसद भवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला. हे अधिवेशन सकारात्मक आणि सृजनात्मक व्हावं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीत सर्वांनी आपापल्या पक्षासाठी काम केलं; जनतेने आपला निकालही दिला; आता पुढची पाच वर्ष सर्व राजकीय पक्...