डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

सिक्कीममधे भूस्खलनामुळे अडकून पडलेल्या ६३ पर्यटकांची सुखरूप सुटका

सिक्कीमच्या उत्तर भागात भूस्खलनामुळे अडकून पडलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्याचं तसंच स्थानिकांना मदत पोहचवण्याचं काम आज आज सकाळी पुन्हा सुरु झालं. पाऊस थांबलयानंतर आज सकाळी पाक्योंग विमानतळावरून मदत सामुग्री घेऊन ३ हेलीकॉप्टर छातेनकडे रवाना झाली. दोन MI-१७ हेलिकॉप्टरमधून ६३ पर्यटकांना छातेनमधून पाक्योंग विमानतळावर पोहचवण्यात आलं आहे. यात परदेशी पर्यटकांचा देखील समावेश आहे. पर्यटकांना बागडोगराहून परत आणण्यासाठी १ हेलिकॉप्टर तैनात करण्यात आलं आहे.

 

तर, सिलीगुडीपर्यंत पोहचवण्यासाठी राज्य सरकारनं बसेसची सोय केली आहे. आज दुपारपर्यंत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम पूर्ण होईल, असा अंदाज आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, दूरसंचार सेवा आणि वीज वितरण विभागाचे कर्मचारी देखील या भागात पोचले असून ते आवश्यक सेवा पुन्हा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा