बीडचे आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय आणि भाजपा कार्यकर्ता सतीश भोसले याला महाराष्ट्र पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या प्रयागराज इथून अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून तो फरार होता.
त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचे दोन, अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत एक आणि वन कायद्याअंतर्गत एक गुन्हा दाखल आहे. याशिवाय अहिल्यानगर जिल्ह्यातही भोसले याच्याविरोधात प्रकरणं प्रलंबित आहेत.
त्याला आज बीडच्या न्यायालयासमोर हजर केलं जाईल. भोसले हा भाजपाच्या ‘भटके विमुक्त आघाडी’चा पदाधिकारी आहे.