डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक रॉबर्ट रेडफोर्ड यांचं निधन

हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक रॉबर्ट रेडफोर्ड यांचं आज पश्चिम अमेरिकेतल्या युटा इथल्या त्यांच्या घरी निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते. 

 

‘Butch Cassidy and the Sundance Kid’, ‘The Sting’ आणि ‘All the President’s Men’ या क्लासिक चित्रपटांमध्ये रेडफोर्ड यांनी साकारलेल्या भूमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती. १९८० साली ‘Ordinary People’ या चित्रपटासाठी सर्वोत्तम दिग्दर्शनासाठीचा ऑस्कर पुरस्कार त्यांना मिळाला होता. तर २००२ मध्ये  ऑस्कर अकादमीकडून मानद जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.