देशाला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ध्येय असून विकसित भारताच्या जडणघडणीत महसूल सेवेची भूमिका महत्त्वाची असेल असं प्रतिपादन केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी केलं. नागपुरातील प्रत्यक्ष कर अकादमी एन ए डी टी इथं 77 व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ आणि सेवापूर्व प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी ते काल बोलत होते . रॉयल भूतान सेवेच्या 2 अधिकाऱ्यांसह 84 आय आर एस अधिकारी प्रशिक्षणार्थींनी 16 महिन्यांचे सेवा पूर्व प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर कर प्रशासकाची शपथ घेतली. देशातील एकूण कर संकलनात 50 टक्के वाटा प्रत्यक्ष कराचा असून, गेल्या आर्थिक वर्षात 9 कोटी कर भरणा नागरिकांनी केला असल्याचं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे सदस्य प्रबोध सेठ यांनी सांगितलं.