डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

August 8, 2024 8:12 PM | RBI

printer

भारतीय रिझर्व बँकेचं तिसरं द्वैमासिक पतधोरण जाहीर

भारतीय रिझर्व बँकेनं आज चालू आर्थिक वर्षातलं तिसरं द्वैमासिक पतधोरण जाहीर करताना सलग नवव्यांदा रेपो दर साडे सहा टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीनं रेपो दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे स्थायी ठेवींवरचा व्याज दर सव्वा सहा टक्के, तसंच मुदत ठेवींवरचा व्याज दर आणि बँकांचा व्याज दर पावणेसात टक्क्यावर कायम राहील, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितलं की आर्थिक विकासाला चालना देताना चलनवाढ निर्धारित उद्दिष्टाशी  सुसंगत राहील, यावर लक्ष केंद्रित करण्यावर पतधोरण समितीनं भर दिला आहे. 

 

रिझर्व बँकेनं चालू आर्थिक वर्षासाठी जीडीपी, अर्थात स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा अंदाजही ७ पूर्णांक २ दशांश टक्के इतका कायम ठेवला. जीडीपी मधली लवचिक आणि स्थिर वाढ पतधोरणाला चलनवाढीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सक्षम बनवते असं गव्हर्नर शक्तिकांत दास  म्हणाले. 

 

कर्जपुरवठा क्षेत्रातल्या अवैध प्रकरणांना आळा घालण्यासाठी डिजिटल कर्ज पुरवठा करणाऱ्या ऍपची सुविधा उपलब्ध करण्याचा रिझर्व्ह बँकेचा विचार असल्याचं गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी घोषित केलं. रिझर्व बँकेनं UPI द्वारे कर भरण्याची मर्यादा देखील १ लाख रुपयांवरून ५ लाख रुपये केली आहे.