राजस्थानमध्ये जयपूरजवळ आज सकाळी झालेल्या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला, तर इतर सात जण जखमी झाले. यापैकी चौघे गंभीर आहेत. दौसा मनोहरपूर महामार्गावर एक कंटेनर आणि कार याच्यात समोरासमोर टक्कर झाली.
यात कारमधलं नवविवाहित जोडपं आणि त्यांचे कुटुंबीय जागीच ठार झाले. जखमींवर जयपूर इथल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.