प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत आतापर्यंत १ लाख ९२ हजार ९३६ सौर उर्जा प्रकल्प बसवून महाराष्ट्राने देशभरात दुसरं स्थान मिळवल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमावर दिली आहे. गेल्या वर्षी १३ फेब्रुवारी पासून सुरु झालेल्या या योजनेत देशभरात १० मार्च २०२५पर्यंत एकूण १० लाख ९ हजार सौर उर्जा प्रकल्प बसवण्यात आले. या योजनेत महाराष्ट्र आपलं योगदान देत राहील तसंच २०२६-२७ पर्यंत १ कोटी कुटुंबांपर्यंत ही योजना पोहोचवण्याचं उद्दिष्ट असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
Site Admin | March 14, 2025 3:32 PM | PM Surya Ghar
१ लाख ९२ हजार ९३६ सौर उर्जा प्रकल्प बसवून महाराष्ट्र देशात दुसरा
