पेहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्याला प्रत्युत्तरादाखल राबवलेलं ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर दहशतवादाचं उच्चाटन करण्याची गरज याबाबत भारताची भुमिका स्पष्ट करण्यासाठी विविध देशांत गेलेल्या बहुपक्षीय शिष्टमंडळाचा आपल्याला अभिमान असल्याचे गौरवोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल काढले.
नवी दिल्लीत या शिष्टमंडळाची भेट घेतली आणि त्यांच्या अनुभवांबद्दल संवाद साधला. या प्रतिनिधींनी विविध 33 देशांतील राजधानीच्या ठिकाणांना भेट दिली आणि राजकीय तसंच सामाजिक स्तरावरील व्यक्तींशी संवाद साधला. दहशतवादाविरोधात काम करण्याची गरज आणि शांततेसाठीची भारताची वचनबध्दता याबाबच त्यांनी भारताची भुमिका स्पष्ट केली.
सर्व प्रतिनिधींचा आपल्याला अभिमान आहे असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या समाजमाध्यमावरील संदेशांत म्हटलं आहे. जागतिक शांततेसाठी भारताच्या वचनबद्धतेला या मित्र राष्ट्रांनी चागला पाठिंबा दिल्याचं सांगत शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यांनी प्रधानमंत्र्यांचं आभार मानले.