मागच्या अकरा वर्षात देशातल्या ऊर्जा क्षेत्रात संरचनात्मक परिवर्तन झालं असूून जनतेला स्वच्छ आणि परवडण्याजोगी ऊर्जा मिळावी यासाठी सरकार आग्रही आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. सुधारणा, हरित ऊर्जा उपक्रम आणि स्वावलंबन यासाठी सरकारचा विशेष आग्रह असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरल्या पोस्टद्वारे सांगितलं. यासाठी त्यांनी पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या एका लेखाचा दाखला दिला.
भारत जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था बनला आहे, तसंच एक धोरणात्मक शक्ति म्हणूनही उदयाला येत आहे, असं पुरी यांच्या या लेखात म्हटलं आहे. ऊर्जा क्षेत्र देशाच्या विकासासाठी महत्त्वाचं असून गेल्या दहा वर्षात केलेल्या कामाच्या पायावर या क्षेत्रात संरचनात्मक परिवर्तन झालं आहे, असं पुरी म्हणाले. प्रधानमंत्र्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखील देशाचं ऊर्जा क्षेत्र आत्मनिर्भर झाल्याचंही पुरी यांनी या लेखात म्हटलं आहे.