डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

April 22, 2025 9:06 PM | PM Narendra Modi

printer

प्रधानमंत्री आणि सौदी अरेबियाचे प्रधानमंत्री यांच्यात द्विपक्षीय चर्चा

सौदी अरेबियाच्या दोन दिवसीय दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज जेद्दाह इथं पोचले. सौदी अरेबियाचे युवराज आणि प्रधानमंत्री मोहम्मद बिन सलमान यांच्यासह प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दुसऱ्या धोरणात्मक भागीदारी परिषदेची बैठक सध्या सुरु आहे.

 

विशेष सन्मान म्हणून, सौदी हवाई क्षेत्रात प्रवेश केल्यापासून सौदीच्या शाही वायूदलातल्या एफ-१५ लढाऊ जेट विमानांनी मोदी यांच्या विमानाची सोबत केली. विमानतळावर २१ तोफांची सलामी देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं. तिथल्या भारतीय समुदायानं सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला मोदी उपस्थित राहिले. त्यानंतर रिट्झ-कार्लटन इथं भारतीय समुदायाला त्यांनी संबोधित केलं. 

 

या दौऱ्यामुळे भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातली मैत्री दृढ होईल, असं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमाद्वारे म्हटलं आहे. आज आणि उद्या विविध कार्यक्रमांमधे सहभागी होण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा