नागालँड विधानसभेतल्या सात आमदारांनी केलेल्या पक्षांतराला आव्हान देण्यासाठी अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व पर्यायांचा विचार करत आहे, असं पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी काल भोपाळ इथं बातमीदारांशी बोलताना सांगितलं. पक्षांतरविरोधी कायद्याखाली हे प्रकरण तपासलं जाईल, यासाठी शक्य ते कायदेशीर पाऊल उचललं जाईल, असं श्रीवास्तव यांनी सांगितलं. विधानसभा निवडणुकीत जनतेनं दिलेल्या जनादेशाचं रक्षण करण्यासाठी पक्ष वचनबद्ध आहे, असं ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच्या सर्व सात आमदार सत्ताधारी नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीत ३१ मे रोजी सामील झाले. एनडीपीपी ने युती धर्माचं उल्लंघन केल्याचा आरोपही राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे.
Site Admin | June 2, 2025 7:13 PM | Brijmohan Shrivastav
नागालँड विधानसभेतल्या ७ आमदारांच्या पक्षांतरप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस कायदेशीर पाऊल उचलण्याच्या तयारीत
