राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात २०२० हे पारंपरिक तत्त्वांचं जतन करुन भविष्याचा वेध घेणारं शिक्षण देण्यात येत असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत मिडीया नेटवर्क शैक्षणिक परिषदेत बोलत होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण भविष्यातल्या शिक्षणासाठी दूरदृष्टीने तयार केलं असून देशातल्या शिक्षण क्षेत्रानं मोठी प्रगती केल्याचही त्यांनी म्हटलं आहे. यामध्ये पायाभूत सुविधा, सर्वसमावेशकता आणि आधुनिकतेला प्राधान्य देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
Site Admin | May 27, 2025 3:08 PM | National Education Policy
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण भविष्यकालीन शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण – शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान
