डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

नाशिकमध्ये योग महोत्सवाचं आयोजन

नाशिक शहरात आज ११व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या ५० दिवसांच्या उलटगणनेनिमित्त योग महोत्सव घेण्यात आला. पंचवटीत रामकुंड परिसरातल्या गौरी मैदान इथं सामूहिक योग प्रात्यक्षिकांनी योग महोत्सवाची सुरुवात झाली. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्यासह अनेक मान्यवर, योग अभ्यासक आणि नागरिक यावेळी उपस्थित होते. ११वा योग दिवस देशात एक लाख ठिकाणी साजरा होईल, यादृष्टीनं नियोजन करण्यात आलं असून, त्यासाठी योगसंगम ॲप तयार करण्यात आलं असून, त्यात नोंदणी करून योगसाधना करता येईल, अशी माहिती जाधव यांनी यावेळी दिली. 

 

मुलं आणि महिलांनी कोणती आसनं करावी, तसंच आजार निहाय कोणत्या प्रकारचे योगासनं उपयुक्त ठरू शकतात याचे पॅकेजेस लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं जाधव यांनी सांगितलं. पुणे जिल्ह्यात लोणावळा इथल्या कैवल्यधाम योग संस्थेमध्ये दोन दिवसांच्या राष्ट्रीय आयुष मिशन परिषदेचं उद्घाटन केंद्रीय आयुष राज्य मंत्र्यांच्या हस्ते काल झालं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा