दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी जगातल्या विविध देशांना भेट देण्यासाठी रवाना झालेली बहुपक्षीय शिष्टमंडळं मायदेशी परतत आहेत. अल्जेरिया, सौदी अरेबिया, कुवेत आणि बहरीन या देशांना भेट देऊन परतलेल्या भाजपा खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं आज नवी दिल्ली इथं परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांची भेट घेतली, आणि आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना सादर केल्या. या उपक्रमातून सरकारची सर्व उद्दिष्टं साध्य झाल्याचं जयशंकर म्हणाले आणि त्यांनी या शिष्टमंडळाचं अभिनंदन केलं, अशी माहिती शिष्टमंडळाचे सदस्य, तसंच राजनैतिक अधिकारी हर्षवर्धन शृंगला यांनी दिली. द्रमुक खासदार कनिमोळी करुणानिधी यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ रशिया, लाटविया, स्लोव्हेनिया, ग्रीस आणि स्पेनचा दौरा करून आज परत येईल.
Site Admin | June 3, 2025 8:16 PM
दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी गेलेली बहुपक्षीय शिष्टमंडळं मायदेशी परतायला सुरुवात, या उपक्रमामुळे सरकारची उद्दिष्टं साध्य झाल्याची परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची प्रतिक्रिया
